Sunday, November 21, 2021

ते पुढे गेलेत मग तू मागे का ?

प्रत्येकाच आयुष्य , इंग्रजीत म्हणायला गेल तर life हे वेगवेगळ असत. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त असतो मग तो सुखी असो वा दुखी. बरोबर ना. पाहिजे असते फक्त शांती .मनाची शांती. आपल्याला स्वतःच मोठ अस घर असाव , त्यात सार्‍या सुविधा असाव्यात, त्यासाठी खूप पैसा असावा आणि चार लोकानी आपल्याला ओळखाव ,आपल ऐकाव अस  आयुष्य म्हणजे सुखी आयुष्य होय अशी सर्वांची मान्यता आहे . 

अगदी माझी पण बऱ्यापैकी तशीच धारणा आहे. अन यात वाईट काय ? काहीच नाही. अगदी आई,वडील भाऊ,बहिण सर्व जर खुश असतील तर आपल्याला आणखी काय हव ,नाही का . आता हे सर्व सगळ्यांनाच मिळेल अस तर नाही . कदाचित मिळूही शकेल. प्रयत्न तर आपण सगळेच करतोय . पण सगळ्यांना हे एकाच वेळी मिळेल हे शक्य आहे का . सांगा तुम्हीच. शक्य असेल तर मला आश्चर्य होईल . 

जर तुमच उत्तर नाही असेल तर तुम्ही माझ्यासारखे विचार करणारे असाल बहुतेक. आपण आपल कर्म करत राहायचं फळाची अपेक्षा न करता . पण फळ हे मिळणार हे माहिती . अस कुठेतरी ऐकलय. किवा वाचलंय. आपल्या आयुष्यात आपली जी स्थिती आहे त्यासाठी आपणच प्रयत्न करायचे असतात हव तर इतरांची मदत घ्यायची असते . पण आपण हातपाय मारल्याशिवाय आपल्याला पोहोता येत नाही तसच आयुष्याच. आपल्याला कोण काय म्हणतय लोक काय म्हणताय याने फरक नसला पडत तरी घरातील मंडळी आणि समाज याची जाणीव नक्की करून देत असतात. 

उदाहरण द्यायचं झाल तर अमुक व्यक्ती खूप पुढे गेलीय आणि आपण मात्र जिथे आहेत तिथेच आहोत अस सांगण. नक्कीच त्या व्यक्तीने परिश्रम घेतले असतील अन ती व्यक्ती पुढे गेली असेल , पण मग आपण काहीच नाही केल असा त्याचा अर्थ होतो का .  प्रत्येकाची शक्ती , विचार करण्याची पद्धत , त्याची परिस्थिती ,त्याला मिळालेली लोकं सर्व वेगवेगळ असत . तुम्हाला यशस्वी व्यायच असेल तर तुमच्यात ईर्ष्या असणेही गरजेचे आहे. पण लोकांनी अस म्हणणे कि तुम्ही का यशस्वी होत नाही आहात , समोरच्या अमुक व्यक्तीने बघा किती कमी वयातच आपल आयुष्य सुधारल , हे ऐकून एकदम स्वतःला कमी समजणे हि माझ्यामते चुकी आहे. 

जगातील सर्वात श्रीमंत लोक काय एकाच वयात श्रीमंत झालेत का ? सर्व यशस्वी माणसे अगदी लहान वयातच यशस्वी होते का ? कदाचित नाही . हो न . आपल्याला त्याच्यासारखं आयुष्य मिळवायचं आहे म्हणून यश मिळवण्यासाठी घाई करायची , याचा काही उपयोग नाही. यात सगळ काही लवकर मिळवण्याच्या चक्कर मध्ये तुम्ही मात्र स्वतःला जो वेळ दिला पाहिजे , ज्या गोष्टी शिकल्या पाहिजे त्या वरचेवर शिकतात आणि मग जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगात पडतात तेव्हा तुमच्या अपूर्ण कलेला आणि ज्ञानाला काही किंमत नसते आणि यशापासून तुमची दुरी वाढतच जाते .

दुसर्यांच्या यशाच्या गतीला पाहून त्यांच्यासारख पटकन यश मिळवण्याच्या मागे लागण्यापेक्षा स्वताच्या गतीने पूर्ण ज्ञान आत्मसात करून मग वाटचाल  केलेली बरी. लोक तर तुम्हाला म्हणतील कि बघ ते तुझ्या पुढे निघून गेलेत आणि तू मागे , पण हे ऐकून स्वतःला कमजोर किवा निराश करून घेण्यापेक्षा किवा घाई करण्यापेक्षा आपण आपल्या क्षमता लक्षात ठेवाव्या आणि हे लक्षात ठेवाव कि प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असते . आज त्याची वेळ आहे उद्या माझी असेल . 

आजच्या ब्लॉग मध्ये कोणताही फोटो नाही टाकला याच कारण म्हणजे बघायचं आहे कि कोणा कोणाला अगदी विना फोटोंच वाचनाची आवड आहे . तुमच्या प्रतिक्रिया comments मध्ये नक्की द्या तुम्हाला काय वाटत . 


No comments:

Post a Comment

पुन्हा त्या वेळेत परत जावसं वाटतंय

आठवणींचा काही वेळ नसतो. कधीही कशावरूनही आपल्याला त्या गाठू शकतात. अगदी एकट असल तरी आणि गर्दीत असल तरी. रोजप्रमाणे आज laptop उघडला आणि स्क्री...