Tuesday, March 29, 2022

श्रद्धांजली रात्रीची

जमले आहेत तारे आज
या काळोखात,
एका चंद्राला घेऊनश्रद्धांजलि वाहायला
त्या प्रकाशाला, त्या उन्हाला, त्या सूर्याला
पाळते आहे सृष्टी मौन
रात्रभर.. आठवणीत त्या दिवसाच्या
गारवा हा पसरला आहे,
एखाद्या शोकसभेत असलेल्या शांततेसारखा
रातकिडे रडत आहेत
एखादा जिवलग गेल्यासारखे
या सगळ्यांचा दिवसाशी काही संबंध नाही तरीही..
आणि बघा या माणसांना,
यांना निद्रा महत्त्वाची वाटते.. 🤷‍♂️

- गिरीश सोनवणे


copyright@girishdsonawane@2022

Thursday, March 3, 2022

अचानक घडलेली सहल - पांडवलेणी

अचानक सहल घडण्याचे कारण:  

आज ट्रेनिंग ला गेलो होतो तेव्हा, बाहेरच्या बाहेरच आम्ही थांबलो. आज काही ट्रेनिंग करायचं मन नाही, अस आम्ही दोघा मित्रांनी एकेमकांना सांगितल. मग आज थोडस या परिसरात फिरून बघू अस ठरल. आम्हा दोघांना नवीन ठिकाण पाहण्याची खूप आवड आधीपासूनच आहे. मग कॉलेज ला कधी लेक्चर ला सुद्धा बंक न करणारे आम्ही गाडी तिथेच लावून, गेट च्या बाहेरच परत गेलो चालत चालत पुढेपर्यंत. 

पांडवलेणी पर्यंतचा प्रवास:

पुढे खूप झाडे, शांतता आढळली. एक नकळत ट्रीप च होतेय अस वाटत होतो. एखाद झाड रस्त्याने दिसल कि हे कुठल्या प्रकारच झाड असाव वगैर आमच बोलन चालू होत. मध्ये मध्ये खूप जोक पण व्हायचे. कुठेतरी रस्त्याने कार चे शोरूम दिसत होते, तर कुठे मोठे हॉटेल्स. कुठे वेगवेगळ्या कंपन्या दिसत होत्या. त्यावर आम्ही चर्चा करत होतो आणि पुढे जात होतो. आज पूर्ण दिवस काढायचा आहे आणि अस किती वेळ आणि कुठेपर्यंत चालत जायचं, परत पण यायचं आहे गाडी घयला आणि मग घरी पण जायचं आहे, हा विचार मनात आला. मग आम्ही एका झाडाखाली थांबलो आणि जवळ कुठे काही फेमस प्लेस आहे का बघण्यासारखी हे गुगल वर शोधलं. बर आहे आताच्या काळात नकाशा अगदी हातात आला आहे, एका क्लिक वर सगळ काही जाणून घेता येत. मग बघता बघता लक्षात आल कि थोड्या लांब अंतरावर पांडवलेणी आहे. नाशिक मध्ये आहोत, पण कधी तिथे गेलोच नव्हतो, मग तिथे जायचं का हा विचार आला. पण एवढ्या लांब पाई पाई जायचं का नाही हा प्रश्न पडला. मग नंतर म्हटल असाही आज दिवसभर वेळ आहे , जाऊन येन पण होईल. शिवाय एक पिकनिक पण होईल. मग आम्ही पुढे जायला निघालो.
 
तेवढ्यात आठवल कि आमचा तिसरा मित्र थोडा उशिरा ट्रेनिंग ला येणार होता. तो आत गेला कि आपल्याला शोधत बसेल. शिवाय त्याचा टिफिन पण आम्हीच आणला होता. सो .... तो आत जायच्या आत त्याला कळवायला हव. एकदा आत गेला कि त्याला येणे जमणार नाही. मग आम्ही त्याला फोन केला. तो फोन उचलत नव्हता. दोन तीन वेळा फोन केल्यावर त्याने तो फोन उचलला. आणि तो कुठे आएह हे विचारल्यावर त्याने "आत चाललो आहे , गेट च्या बाहेर आहे" असे उत्तर दिले. मग त्याला सांगितले कि आधी गेट च्या बाहेर पार्किंग जवळ ये आणि मग त्याला सर्व सांगितल. तो पण म्हणाला कि मी येतो गाडी घेऊन तुमच्यापर्यंत. मग आम्ही पुढे हळू हळू चालत गेलो आणि तो पण आला. सगळ्या गोष्टी परफेक्ट झाल्या. मग आम्ही तिघे खूप मज्जा मस्त करत पुढे चालत गेलो. आता आम्ही गेट च्या समोरच होतो पांडव लेणी च्या. मग काय आम्ही आत शिरलो. बाहेर पोलीस होते. माझ्या मोत्राने नेमके गाडीचे लायसन्स आणले नव्हते. त्यामुळे त्याने गाडी दुसरीकडे पार्क केली आणि आला. 

पांडवलेणी चा परिसर: 

गेट च्या आत शिरताच एक वेगळीच अनुभूती आली. शांत, सुंदर , शीतल अश्या वाईब्स येऊ लागल्या. दुपारची वेळ होती. त्या उन्हात आजूबाजूची मोठी मोठी झाडे छान सावली तयार करत होती. पक्षांचा आवाज येत होता. गर्दी काहीच नव्हती. फक्त तिथे काही खाण्यापिण्याचे पदार्थ विकणारे लोक होते. एखाद्या गार्डन मध्ये आलो आहोत असे वाटत होते. पुढे जाता जाता एक हिरवे असे मोकळे मैदान होते, तिथे कुठलेतरी कुटुंब जेवण करत होते आणि त्यांची मुले खेळत होती. आजूबाजूला काही बाक होते तिथे कोणी झोपले होते तर कोणी चर्चा करत बसले होते. झाडे हि खूप छान होती. कसली होती हे आठवत नाही पण छान होती. 

मग आम्ही पुढे गेलो तर आम्हाला काही पायऱ्या दिसल्या. त्या पायऱ्यांनी आम्ही वर चढायला लागलो. तिथे मोठी मोठी झाडे होती. पायर्यांवर काही झाडांची सुकलेली पाने होती. मोकळी हवा चालू होती. त्यातल्या त्यात, पक्षी चिवचिवाट करत होते आणि शांतता होती. आम्ही तिथे काही फोटो काढले आणि मग पुढे निघालो. पायऱ्यांच्या बाजूला काही काही अंतरावर माहिती असणारे हिरव्या रंगाचे फलक लावले आहेत. त्यात पांडवलेणी बद्दल माहिती आहे. पाहिलंय फलकापासून ते शेवटच्या फलकापर्यंत  खूप छान माहिती दिलेली आहे. पर्यटक गुफेची वैशिष्ट्ये दिली आहेत. त्यासोबतच काही इतिहासाची प्रमाणे दिलेली आहेत. ती सर्व आम्ही वाचली. चालता चालता थोडस दमलो आणि एके ठिकाणी पायऱ्यांच्या वळणाला थांबलो. 

तिथून नाशिक पूर्ण दिसते. म्हणजे जास्तीतजास्त नाशिक, त्यातील डोंगर, इमारती, रस्ते सर्व दिसतात. रस्त्यावरून जाणारी वाहने खेळण्यातल्या वाहनांसारखी दिसतात. तिथे उभे राहून आम्ही मनसोक्त गप्पा केल्या. दिसणारी इमारत कोणती असेल, किवा हे बघ हे ठिकाण मी ओळखतो असे आम्ही इशारा करून दाखवत होतो तिथून.

 

मग आम्ही पुढे गेलो. तिथे वरती तिकीट काढण्यासाठी गेलो. इथून पुढे खरी पांडवलेणी सुरु होणार होती. तिकीट काढण्यासाठी मी काही पैसे आणलेच नव्हते, कारण ट्रेनिंग ला जाताना मी काही ठरवले नव्हते. माझ्या फोनपे मध्ये पैसे होते. त्याने काढूयात असे ठरवले. पण इथे फोनपे वगैरे नाही चालत असे सांगितल्यावर थोडी निराशा झाली. मग आम्ही सर्वांनी दप्तरात बघितले कि कुठे पैसे आहेत का. मग मित्राकडे होते त्याने सर्वांचे तिकीट काढले. कमालीची गोष्ट म्हणजे आमचे तिकीट आणि परदेशी लोकांचे तिकीट, यांच्या किमतीमध्ये खूप फरक होता. तिथे काही खाण्यापिण्याचे पदार्थ विकणारे कोणी नव्हते. कारण सर्वाना माहिती आहे कि हि ऐतिहासिक वास्तू आहे म्हणून. मग आम्ही वरती गेलो. 

पांडवलेणी: 



पहिले पाउल ठेवताच मनात एक आश्चर्य आणि कुतूहल भरून आले. आणि आनंदही झाला. एवढ्या पायऱ्या चढल्यानंतर फायनली इथे पोहोचलो म्हणून एकदम निवांत वाटत होते. आता मस्तपैकी बागडायचे, एक एक गोष्ट निरीक्षण करून पहायची हेच मनात होते. माझ्यातला इतिहास आणि वास्तू प्रेमी जागा झाला. आम्ही समोर दिसणाऱ्या पहिल्या गुफेत गेलो. चप्पल बाहेर काढल्या आणि आत प्रवेश केला. 

पर्वताच्या दगडांना कोरून आणि त्यात गुफा बनवलेली आहे. बाहेर जमिनीच्या सपाट भागापासून थोडा उंचावर एक व्हरांडा आहे. त्याच्या वरती एक छत आहे. छत आणि व्हरांडा यांना जोडणारे खांब आहेत. ते पूर्णपणे दगडांनी  बनलेले आहेत, त्यावर छान असे नक्षीकाम आहे. जास्त नाही पण गरजेपुरती आकृती त्या खांबाना देण्यात आली आहे. बऱ्याच नाही प्रत्येक खांबावर हत्ती च्या मुखाची, आणि इतरही प्राण्यांची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. व्हरांड्यात पाय ठेवताच तुम्हाला एक शांतता आणि गारवा अनुभवतो जो विशेष आहे. अतिशय मिनिमल म्हणतात ना तसे तिथले शिल्प आहे. आत प्रवेश करण्यासाठी एक दरवाजा आहे. एक नाही तर प्रत्येक गुफेसाठी एक आहे. आणि काही गुफांमध्ये थोडासा फरक जाणवतो. आणि तिथे दरवाजे हे नवीन बसवले आहेत हे जाणवते. प्रशासनाने थोडी सुधारणा करण्यासाठी केले असावे. असो ... 

आत शिरल्यावर फरशी नसून तिथे डोंगराचा च भाग आहे जो सपाट केला गेला आहे. तिथे खाली जमिनीवरही कुठेतरी सारीपाट वगैर च्या नक्षी कोरल्या गेल्या आहेत. त्या आताच्या आहेत कि पूर्वीपासूनच आहेत हे काही ठाऊक नाही. भिंतींवर बसलेले बौद्ध भिक्षु आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिकृती आहेत. प्रत्येक गुफेत सारख्याच प्रतिकृती आहेत.  कुठे मोठ्आया आकाराच्णिया तर कुठेतरी छोट्या आकाराच्या. काही स्त्रियांची हो चित्रे आहेत. कुठेतरी वेगळी शिल्पे पण आहेत. आणि प्रत्येक गुफेत काही खोल्या आहेत, तिथे आत शिरताना मोबाईल चा प्रकाश घेऊन जावे लागते. तिथे कुठलीही शिल्पे वगैरे नाहीत. तिथे फक्त आणि फक्त भिंतीला लागून एक उंच ओटा आहे, ज्यावर एक व्यक्ती झोपू शकतो व बसू शकतो. बहुतेक हि जागा बौद्ध भिक्षु ना ध्यान करण्यासाठी असेल. अशा कित्येक खोल्या प्रत्येक गुफेत आहेत.




गुफेत शिरल्यानंतर आतून बाहेर पहिले कि वर असलेल्या रुंद खिडक्या, आणि समोर असलेले दरवाजे यातून पुष्कळ प्रकाश आत येतो. तिथे गेल्यावर त्या काळी लोक कसे राहत असतील याची थोडी फार जाणीव होते. आम्ही तिथे थोडा वेळ फिरलो आणि प्रत्येक गुफा पहिली. त्यानंतर बाहेर आलो. तिथे काही ठिकाणी पाण्याचे कुंड होते. डोंगरातून झिरपणारे पावसाचे पाणी तिथे येऊन साठते. त्याचेही अतिशय कुशलतेने रचना केली आहे हेच जाणवते. खाली पाहून झालेल्या गुफा झाल्यावर वरती सुद्धा गुफा होत्या. 




वनभोजन : 
त्या पाहण्याआधी जेवण करूयात असे वाटले आणि मग आम्ही जेवणासाठी जागा शोधू लागलो. जेवणासाठी काही व्यवस्था किवा जागा तर नव्हती. आणि या ठिकाणी जेवणे योग्य असेल का हेच प्रश्न होते, मग आम्ही डोंगराच्या कडेकडे चालत गेलो आणि तिथे काही लोक जेवत होते. 
खूप सावली, आजूबाजूला दिसणारे नाशिक, शांतता, पक्ष्यांच्या आवाजात आम्ही तिथे जमिनीवर बसून जेवण केले. वनभोजन असावे तसेच. जुन्या काळातही लोक इथेच असेच जेवण करत असतील असे वाटले. 

सहल संपताना: 

मग जेवण झाल्यावर आम्ही पुन्हा नव्या उत्साहाने पांडवलेणी पहिली. तिथे काही अजून नवीन गुफा दिसल्या. त्यात धार्मिक बुद्ध यंत्र असावे, असे मोठे दगडाचे शिल्प दिसले. आणि मग सगळ्या गुफा पाहून झाल्यावर आम्ही तिथे एके ठिकाणी बसून गप्पा केल्या, फोटो काढलेत, काही गोष्टी वाचल्या आणि येणारे जाणारे परदेशी लोक पहिले. भरपूर काही पाहून झाले. मनाला अगदी तृप्त आणि शांत वाटत होते. असे वाटत होते आता इथेच एक विश्रांती घेऊन झोपून घ्यावे. आयुष्यातले आतापर्यंतचे सर्व टेन्शन विसरून मी निवांत झालो होतो. 

मग आम्ही पुन्हा खाली आलो. बाजूच्या बागेत बसलो तिथे थोडी विरंगुळा आणि आराम केला. आणि मग पुन्हा ट्रेनिंग च्या ठिकाणी जाऊन, आपापल्या वाहनांवर घरी गेलो. आणि आज कितीतरी दिवसानंतर मी तो अनुभव इथे लिहितो आहे. आणि लिहिताना मला तिथला प्रत्येक क्षण आठवतो आहे आणि मी मनाने पुन्हा प्रसन्न, शुद्ध आणि शांत होत आहे. तर हि होती अचानक घडलेली आमची सहल, पांडवलेणी ला. नाशिक ला आलात तर पांडवलेणी ला एकदा नक्की भेट देऊन पहा. तुम्हाला शिल्पे, ऐतिहासिक गोष्टी पाहयची इच्छा असेल तर उत्तम. आणि नसेल तरीही तुम्ही एक सहल किवा पिकनिक म्हणून नक्कीच येऊ शकतात. धन्यवाद. 

Wednesday, March 2, 2022

सृष्टी, मनुष्य, धर्म याबद्दल मनात असलेले प्रश्न

सुंदरता, रंग , जीवन , वैविध्य या सर्व गोष्टींनी भरलेली सृष्टी किती छान वाटते नाही का? पृथ्वी छान वाटण्यापेक्षा तिचे असित्व हेच मोठे गूढ आहे. त्यातल्या त्यात प्रत्येक गोष्टीचे, जीवाचे उगमस्थान हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. त्यात मनुष्य असणे हि अहोभाग्याची गोष्ट. मनुष्यालाच आपला उगम कसा झाला, आपले पूर्वज कोण होते या गोष्टीचा शोध लावण्याची उत्सुकता आहे. हि सृष्टी पाचही इंद्रियांनी अनुभवता येते, या पेक्षा मोठी गोष्ट मनुष्यासाठी तरी नाही, आणि त्यातही हा अनुभव व्यक्तही करता येतो, अनुभव हि करता येतो. कितीतरी गोष्टी आहेत ज्या मनुष्याकडेच दुर्मिळ आहेत. असो..

मनुष्याची उत्त्प्ती कशी झाली हा एक प्रश्नच आहे? त्यानुसार नेमका देव कोणता असाही एक प्रश्न आहे? त्याहुनी अवघड म्हणजे देव आहे कि नाही? हे जाणणे. धर्म, जाती, वर्ण इत्यादी गोष्टी कोणी कश्या बनवल्या हे जरी माहिती नसले तरी आपल्याला एवढा अंदाज लावता येतो कि माणसांनी हळू हळू काळासोबत हे सर्व तयार केल असाव, स्वतःच श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी. प्रत्येक देशात, खंडात वेगवेगळ्या प्रकारची लोक सापडतात, तेही वेगवेगळ्या धर्माची. यातला मूळ धर्म कोणता? ग्रीक पुराणांमध्ये असलेले देवी देवता आणि ख्रिश्चन धर्मामध्ये असलेले देवी देवता एकच आहेत का? कि हिंदू देवी देवता मूळ देवी देवता आहेत? मुस्लीम धर्मात मूर्तीपूजा नसली तरी त्यांचाही एक देव आहेच. खरच देवतांमध्ये हि जाती आणि धर्म असतील का? असले तर या जगातील जाती धर्म त्यांनीच निर्माण केले का? जर पूर्ण विश्वाची देवता एकच असेल तर कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला ती देवता आपल्या दरबारात आश्रय देत असेल का? 

जर मनुष्यांनी धर्म निर्माण केले असतील, तर सृष्टीच्या आदिकाळात एकमेकांपासून लाखो मैल दूर असलेले हे लोक, त्यांना सर्वाना हे कसे वाटले असेल कि आपल्यापेक्षा मोठी अशी कुठलीतरी देवता आहे ते? आपला धर्म कोणता? सगळीकडे हि धार्मिक भावना निर्माण कशी झाली असावी याचा शोध बहुतेक कोणीतरी केला असेल आणि लिहूनही ठेवले असेल. असो ......

धर्म जरी बाजूला ठेवला तरी मनुष्याची उत्पत्ती त्याचा विकास कसा झाला, या गोष्टींना शोधणे खूप मजेशीर आणि कुतूहलाने भरलेले आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने एवढे ज्ञान लिहून ठेवले आहे कि कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवावा हेच अवघड होते नाही का? माझ्यासाठी तरी हा सृष्टीच्या जन्मापासून तर मनुष्याच्या विकासाचा प्रवास खूपच  कुतूहलाने भरलेला आहे. या शोधात पूर्णपणे स्वतःला गुंतवून घेणे मला आवडेल, जगातील वेगवेगळ्या संस्कृती जाणून घ्यायला आवडेल. 

तुम्हालाही आवडेल का हि सारी प्रश्न उत्तरे जाणून घ्यायला? 

@गिरीश सोनवणे 

पुन्हा त्या वेळेत परत जावसं वाटतंय

आठवणींचा काही वेळ नसतो. कधीही कशावरूनही आपल्याला त्या गाठू शकतात. अगदी एकट असल तरी आणि गर्दीत असल तरी. रोजप्रमाणे आज laptop उघडला आणि स्क्री...