Sunday, November 21, 2021

शांतता

 मनातील क्लिष्ट प्रश्नांना

शांतता कुठे मिळावी

आठवणींच्या प्रवासाला

स्थगिती कुठे कळावी 


कधी न पाठवलेली पत्रं

खूप काही बोलू पाहतात 

न कळलेली अपूर्ण गोष्ट 

ते बरोबर सांगतात 


या अपूर्ण गोष्टीला 

समाप्ती कधी भेटावी

मनातील क्लिष्ट प्रश्नांना

शांतता कुठे मिळावी


पाहिलेली वाट 

सार्थकी लागेल का 

भेट होईल वा 

वेळ लागेल का 


या वाट पाहण्याच्या कार्यक्रमाला 

सांगता कधी मिळावी 

मनातील क्लिष्ट प्रश्नांना

शांतता कुठे मिळावी


वयाच्या प्रत्येक टप्प्यातील 

काही ओल्या आठवणी 

अजूनही परत बघायला लावतात 

आठवू नको म्हणता

कुठल्यातरी कोपऱ्यातून 

प्रत्येक वेळेला डोकावतात 


डोकावणार्‍या आठवणींच्या खिडकीला 

बंदी कधी घालावी 

मनातील क्लिष्ट प्रश्नांना

शांतता कुठे मिळावी


निसर्गाच्या सानिध्यात  

फेरी एक मारून बघावी

हवेची एक झुळूक 

अनुभवून घ्यावी 


हवेची ती झुळुक 

आतपर्यंत कधी जावी 

मनातील क्लिष्ट प्रश्नांना

शांतता कुठे मिळावी


-गिरीश सोनवणे 

All content subject to copyright 

No comments:

Post a Comment

पुन्हा त्या वेळेत परत जावसं वाटतंय

आठवणींचा काही वेळ नसतो. कधीही कशावरूनही आपल्याला त्या गाठू शकतात. अगदी एकट असल तरी आणि गर्दीत असल तरी. रोजप्रमाणे आज laptop उघडला आणि स्क्री...