Sunday, November 21, 2021

पुन्हा त्या वेळेत परत जावसं वाटतंय

आठवणींचा काही वेळ नसतो. कधीही कशावरूनही आपल्याला त्या गाठू शकतात. अगदी एकट असल तरी आणि गर्दीत असल तरी. रोजप्रमाणे आज laptop उघडला आणि स्क्रीनसमोर जाऊन बसलो. काही नवीन आलय का हे बघायचं असत. मग इमेल , twitter website वगैर आलंच त्यात. सगळ चेक्क करत असताना वाटल कि आज काहीतरी लिहावं. लिहायला बसलो मग. समोरच लिहिण्यासाठी कोर पान open झाल.मग त्यात काय लिहावं सुचेनास झाल. काही लिहावं पण मग आवडल नाही कि backspace दाबून सर्व पुसून टाकाव असच चालल खूप वेळ.मग वाटल लिहू नये आणि मग सगळ पुसून आल ते परत कोर पान. आज एकतर वातावरण खूप छान आहे. थंड हवा आणि मंद नवा प्रकाश. सर्व काही छान. पण लिहायला काहीच नाही.मग फक्त त्या white स्क्रीन कडे पाहत बसलो.

मग मला असच वातावरण पाहून आधीचे दिवस आठवले. आधीचे म्हणजे शाळेच्या वेळेचे जेव्हा मी तिसरी चौथीला असेल. आमची शाळा ... म.न.पा. शाळा क्रमांक ९९ . शनिवारी सकाळी शाळा असायची. वातावरण सेम आज सारखेच बर का . थंड हवा सूर्य नुकताच उगवणार असायचा. आम्ही कंपनी च्या एका रूम मधेच राहायचो . पण पूर्ण परिसरात कोणीच नसायचं कारण सगळ्या कंपन्या बंद असायच्या. सकाळी लवकर उठून, शाळेचा गणवेश घालून तयार असायचो. खूप भारी वाटायचं शनिवारची शाळा म्हणजे. आम्ही दोन तीन मित्र पायीं पायी शाळेत जायला निघायचो. थंडी असो काही असो कुडकुडत का होईना शाळा मात्र आवडायची. मग हळू हळू तो रस्ता चालत जायचो. कोणीतरी शेकोटी करत असल कि थोड्या वेळ बसायचो आणि परत शाळेला. थोडी मस्ती करत कधी शर्यत लावत तो लांबचा रस्ता पूर्ण करायचो. हे सगळ आज आठवल कि खूप छान वाटत.

शाळेत जाऊन परिपाठाला उभ राहायचं , लेट झाला कि छड्या खायच्या. परिपाठ तर असायचा त्यासोबत कवायत पण असायची शनिवारी. अशे अवघड अवघड व्यायाम करायला लावायचे कि काही विचारूच नये. अवघड नसायचे पण खूप वेळ त्या band आणि खुळ्खुल्याच्या आवाजावर तेच तेच परत करत राहायचे. नाही केल तर सर मागेच उभे असायचे. कधी band कधी पिआनो वापरून शिक्षक जणू आमच्यावर प्रयोगच करायचे. प्रार्थना सुविचार वगैरे आटोपलं कि मग कुठेतरी वर्गात न्यायचे. मग कसातरी वर्ग भरायचा. शिकवण काही व्हायचं नाही शनिवारी.

हजेरी वगैर द्यायची आणि कधी एकदा जेवणाची सुट्टी होते ती वाट बघायचो. मग दरवाज्याच्या चौकटीतून खिचडी वाल्या मावशी दिसल्या किवा त्यांची रिक्षाचा आवाज आला कि लगेच कळायचे कि आता सुट्टी होणार. मग एकदा घंटा वाजली कि आपापला डबा घेऊन सर्व जन तो संपवायचो लवकर आणि मग खेळायचो. कधी जोडीची साखळी कधी चोर पोलीस कधी पकडापकडी. खूप मजा असायची जणू हेच life होत. काहीच टेन्शन नाही. मग सुट्टी झाली कि घरी जायचं आणि दिवसभर नुस्त खेळायचं आणि खेळायचं.

किती छान होत सगळ. आता ते सर्व आठवल कि अस वाटत परत वेळेत मागे जावं आणि परत तसच सगळ कराव.

आता मग हे सगळ स्क्रीन वर उतरवल आणि मग मनाला कुठे बर वाटल. माझ्या मताने तुम्हाला पण आठवत असेल तुमची शाळा आणि अश्याच काहीतरी आठवणी असतील ना ! वाटल तर comment मध्ये share करा .

No comments:

Post a Comment

पुन्हा त्या वेळेत परत जावसं वाटतंय

आठवणींचा काही वेळ नसतो. कधीही कशावरूनही आपल्याला त्या गाठू शकतात. अगदी एकट असल तरी आणि गर्दीत असल तरी. रोजप्रमाणे आज laptop उघडला आणि स्क्री...