Sunday, November 21, 2021

ऑनलाईन शिक्षण- शिक्षक, विद्यार्थी, syllabus आणि परीक्षा

हल्ली सर्व काही पुन्हा पूर्ववत होत चाललंय. पुन्हा लोकांची कामे सुरु झालीत, कुठे हॉटेल्स वगैर पण चालू झालेत. रिक्षा, taxi, बस वगैर पण सुरु झालेत. आता कुठेतरी सर्व काही चालू होताना दिसतंय. त्यासोबत पुन्हासारखी घाई आणि वर्दळ हि दिसतेय. मास्क लावणे हे आधी वेगळेच वाटायचे पण सध्या ते सर्वांच्या दैनंदिन चालीरीतीत बसले आहे. नाही म्हणता म्हणता सर्व जणांनी कोविड चा हा धर्म स्वीकारलाच म्हणयला लागेल.

यात परत सुरु झाले नाहीत ते शाळा आणि कॉलेज. ऑनलाईन lecture आहेत. खरा वर्ग आणि ऑनलाईन वर्ग यात काहीसा फरक तर आहेच. पण त्या माध्यमातून तरी शिक्षण सुरु आहे म्हणजे देव पावला. सुरुवातीला खूप साऱ्या अडचणी यायच्या. शिक्षक हि ऑनलाईन पद्धत शिकत होते, विद्यार्थी हि थोडेसे घाबरत होते, शिकत होते. नेटवर्क चाही भरपूर प्रोब्लेम होता खूप ठिकाणी. पण आता सर्व काही जवळपास ठीकठाक झाले आहे. आता सर्व नॉर्मल आहे असे वाटते.

ऑनलाईन म्हटल कि शिक्षक आता कुठून तरी PPt डाउनलोड करून घेतात आणि आपल शिकवायला सुरुवात करतात. काही शिक्षक स्वतः ppt बनवतात आणि शिकवतात. काही समजावून सांगतात. काही फक्त एकदा ppt घेतली कि फक्त वाचतात. जे लिहिलंय तेच एका लाईन मध्ये परत बोलतात आणि झाल. आणि syllabus पटापट कसा संपेल याच्या मागे असतात. या सगळ्या गोष्टी पण बदलयला हव्यात.

एक semester सहा महीन्याच असत, आता ते एका दोन महिन्यात उरकवून त्यात परीक्षा पण घेऊन होतात. या पद्धतीत खरच विद्यार्थ्याला गुणवत्ता मिळते का? practical ची परीक्षा घेतात, पण practical नाही , मग हे practical चे गुण काय उपयोगाचे? नाही का . व्यावसायिक अभ्यासक्रमात तरी practicals व्हायला हवेत, त्याशिवाय ते शिक्षण व्यावसायिक कसल ?

विद्यापीठाला तरी कळायला हव कि एक दोन महिन्यात एवढा अभ्यासक्रम खरच विद्यार्थ्यांना समजतो का? त्यांना गुणवत्ता मिळतेय का? जर असेच चालत राहिले तर , व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणता म्हणता हा फक्त पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम आहे अस म्हणाव लागेल.

या सगळ्यात चार महत्त्वाचे भाग म्हणजे शिक्षक, विद्यार्थी , कॉलेज आणि विद्यापीठ. या सर्वात समन्वय असला कि सर्व काही व्यवस्थित होईल. विद्यार्थ्याने हि आपली जवाबदारी समजायला हवी. हे सर्व overall मित्र, विद्यार्थी आणि एकंदरीत सर्व परिस्थिती याच्यावरून मांडल. आता बऱ्यापैकी सर्व नीट दिसतंय. शिक्षणाच्या बाबतीत सध्या तरी सर्व काही सुरळीत चाललंय, पण विद्यापीठाशी असलेली तक्रार कधी निस्तरेल अस सध्या वाटत नाही.

No comments:

Post a Comment

पुन्हा त्या वेळेत परत जावसं वाटतंय

आठवणींचा काही वेळ नसतो. कधीही कशावरूनही आपल्याला त्या गाठू शकतात. अगदी एकट असल तरी आणि गर्दीत असल तरी. रोजप्रमाणे आज laptop उघडला आणि स्क्री...