Wednesday, March 2, 2022

सृष्टी, मनुष्य, धर्म याबद्दल मनात असलेले प्रश्न

सुंदरता, रंग , जीवन , वैविध्य या सर्व गोष्टींनी भरलेली सृष्टी किती छान वाटते नाही का? पृथ्वी छान वाटण्यापेक्षा तिचे असित्व हेच मोठे गूढ आहे. त्यातल्या त्यात प्रत्येक गोष्टीचे, जीवाचे उगमस्थान हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. त्यात मनुष्य असणे हि अहोभाग्याची गोष्ट. मनुष्यालाच आपला उगम कसा झाला, आपले पूर्वज कोण होते या गोष्टीचा शोध लावण्याची उत्सुकता आहे. हि सृष्टी पाचही इंद्रियांनी अनुभवता येते, या पेक्षा मोठी गोष्ट मनुष्यासाठी तरी नाही, आणि त्यातही हा अनुभव व्यक्तही करता येतो, अनुभव हि करता येतो. कितीतरी गोष्टी आहेत ज्या मनुष्याकडेच दुर्मिळ आहेत. असो..

मनुष्याची उत्त्प्ती कशी झाली हा एक प्रश्नच आहे? त्यानुसार नेमका देव कोणता असाही एक प्रश्न आहे? त्याहुनी अवघड म्हणजे देव आहे कि नाही? हे जाणणे. धर्म, जाती, वर्ण इत्यादी गोष्टी कोणी कश्या बनवल्या हे जरी माहिती नसले तरी आपल्याला एवढा अंदाज लावता येतो कि माणसांनी हळू हळू काळासोबत हे सर्व तयार केल असाव, स्वतःच श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी. प्रत्येक देशात, खंडात वेगवेगळ्या प्रकारची लोक सापडतात, तेही वेगवेगळ्या धर्माची. यातला मूळ धर्म कोणता? ग्रीक पुराणांमध्ये असलेले देवी देवता आणि ख्रिश्चन धर्मामध्ये असलेले देवी देवता एकच आहेत का? कि हिंदू देवी देवता मूळ देवी देवता आहेत? मुस्लीम धर्मात मूर्तीपूजा नसली तरी त्यांचाही एक देव आहेच. खरच देवतांमध्ये हि जाती आणि धर्म असतील का? असले तर या जगातील जाती धर्म त्यांनीच निर्माण केले का? जर पूर्ण विश्वाची देवता एकच असेल तर कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला ती देवता आपल्या दरबारात आश्रय देत असेल का? 

जर मनुष्यांनी धर्म निर्माण केले असतील, तर सृष्टीच्या आदिकाळात एकमेकांपासून लाखो मैल दूर असलेले हे लोक, त्यांना सर्वाना हे कसे वाटले असेल कि आपल्यापेक्षा मोठी अशी कुठलीतरी देवता आहे ते? आपला धर्म कोणता? सगळीकडे हि धार्मिक भावना निर्माण कशी झाली असावी याचा शोध बहुतेक कोणीतरी केला असेल आणि लिहूनही ठेवले असेल. असो ......

धर्म जरी बाजूला ठेवला तरी मनुष्याची उत्पत्ती त्याचा विकास कसा झाला, या गोष्टींना शोधणे खूप मजेशीर आणि कुतूहलाने भरलेले आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने एवढे ज्ञान लिहून ठेवले आहे कि कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवावा हेच अवघड होते नाही का? माझ्यासाठी तरी हा सृष्टीच्या जन्मापासून तर मनुष्याच्या विकासाचा प्रवास खूपच  कुतूहलाने भरलेला आहे. या शोधात पूर्णपणे स्वतःला गुंतवून घेणे मला आवडेल, जगातील वेगवेगळ्या संस्कृती जाणून घ्यायला आवडेल. 

तुम्हालाही आवडेल का हि सारी प्रश्न उत्तरे जाणून घ्यायला? 

@गिरीश सोनवणे 

No comments:

Post a Comment

पुन्हा त्या वेळेत परत जावसं वाटतंय

आठवणींचा काही वेळ नसतो. कधीही कशावरूनही आपल्याला त्या गाठू शकतात. अगदी एकट असल तरी आणि गर्दीत असल तरी. रोजप्रमाणे आज laptop उघडला आणि स्क्री...