Tuesday, March 29, 2022

श्रद्धांजली रात्रीची

जमले आहेत तारे आज
या काळोखात,
एका चंद्राला घेऊनश्रद्धांजलि वाहायला
त्या प्रकाशाला, त्या उन्हाला, त्या सूर्याला
पाळते आहे सृष्टी मौन
रात्रभर.. आठवणीत त्या दिवसाच्या
गारवा हा पसरला आहे,
एखाद्या शोकसभेत असलेल्या शांततेसारखा
रातकिडे रडत आहेत
एखादा जिवलग गेल्यासारखे
या सगळ्यांचा दिवसाशी काही संबंध नाही तरीही..
आणि बघा या माणसांना,
यांना निद्रा महत्त्वाची वाटते.. 🤷‍♂️

- गिरीश सोनवणे


copyright@girishdsonawane@2022

Thursday, March 3, 2022

अचानक घडलेली सहल - पांडवलेणी

अचानक सहल घडण्याचे कारण:  

आज ट्रेनिंग ला गेलो होतो तेव्हा, बाहेरच्या बाहेरच आम्ही थांबलो. आज काही ट्रेनिंग करायचं मन नाही, अस आम्ही दोघा मित्रांनी एकेमकांना सांगितल. मग आज थोडस या परिसरात फिरून बघू अस ठरल. आम्हा दोघांना नवीन ठिकाण पाहण्याची खूप आवड आधीपासूनच आहे. मग कॉलेज ला कधी लेक्चर ला सुद्धा बंक न करणारे आम्ही गाडी तिथेच लावून, गेट च्या बाहेरच परत गेलो चालत चालत पुढेपर्यंत. 

पांडवलेणी पर्यंतचा प्रवास:

पुढे खूप झाडे, शांतता आढळली. एक नकळत ट्रीप च होतेय अस वाटत होतो. एखाद झाड रस्त्याने दिसल कि हे कुठल्या प्रकारच झाड असाव वगैर आमच बोलन चालू होत. मध्ये मध्ये खूप जोक पण व्हायचे. कुठेतरी रस्त्याने कार चे शोरूम दिसत होते, तर कुठे मोठे हॉटेल्स. कुठे वेगवेगळ्या कंपन्या दिसत होत्या. त्यावर आम्ही चर्चा करत होतो आणि पुढे जात होतो. आज पूर्ण दिवस काढायचा आहे आणि अस किती वेळ आणि कुठेपर्यंत चालत जायचं, परत पण यायचं आहे गाडी घयला आणि मग घरी पण जायचं आहे, हा विचार मनात आला. मग आम्ही एका झाडाखाली थांबलो आणि जवळ कुठे काही फेमस प्लेस आहे का बघण्यासारखी हे गुगल वर शोधलं. बर आहे आताच्या काळात नकाशा अगदी हातात आला आहे, एका क्लिक वर सगळ काही जाणून घेता येत. मग बघता बघता लक्षात आल कि थोड्या लांब अंतरावर पांडवलेणी आहे. नाशिक मध्ये आहोत, पण कधी तिथे गेलोच नव्हतो, मग तिथे जायचं का हा विचार आला. पण एवढ्या लांब पाई पाई जायचं का नाही हा प्रश्न पडला. मग नंतर म्हटल असाही आज दिवसभर वेळ आहे , जाऊन येन पण होईल. शिवाय एक पिकनिक पण होईल. मग आम्ही पुढे जायला निघालो.
 
तेवढ्यात आठवल कि आमचा तिसरा मित्र थोडा उशिरा ट्रेनिंग ला येणार होता. तो आत गेला कि आपल्याला शोधत बसेल. शिवाय त्याचा टिफिन पण आम्हीच आणला होता. सो .... तो आत जायच्या आत त्याला कळवायला हव. एकदा आत गेला कि त्याला येणे जमणार नाही. मग आम्ही त्याला फोन केला. तो फोन उचलत नव्हता. दोन तीन वेळा फोन केल्यावर त्याने तो फोन उचलला. आणि तो कुठे आएह हे विचारल्यावर त्याने "आत चाललो आहे , गेट च्या बाहेर आहे" असे उत्तर दिले. मग त्याला सांगितले कि आधी गेट च्या बाहेर पार्किंग जवळ ये आणि मग त्याला सर्व सांगितल. तो पण म्हणाला कि मी येतो गाडी घेऊन तुमच्यापर्यंत. मग आम्ही पुढे हळू हळू चालत गेलो आणि तो पण आला. सगळ्या गोष्टी परफेक्ट झाल्या. मग आम्ही तिघे खूप मज्जा मस्त करत पुढे चालत गेलो. आता आम्ही गेट च्या समोरच होतो पांडव लेणी च्या. मग काय आम्ही आत शिरलो. बाहेर पोलीस होते. माझ्या मोत्राने नेमके गाडीचे लायसन्स आणले नव्हते. त्यामुळे त्याने गाडी दुसरीकडे पार्क केली आणि आला. 

पांडवलेणी चा परिसर: 

गेट च्या आत शिरताच एक वेगळीच अनुभूती आली. शांत, सुंदर , शीतल अश्या वाईब्स येऊ लागल्या. दुपारची वेळ होती. त्या उन्हात आजूबाजूची मोठी मोठी झाडे छान सावली तयार करत होती. पक्षांचा आवाज येत होता. गर्दी काहीच नव्हती. फक्त तिथे काही खाण्यापिण्याचे पदार्थ विकणारे लोक होते. एखाद्या गार्डन मध्ये आलो आहोत असे वाटत होते. पुढे जाता जाता एक हिरवे असे मोकळे मैदान होते, तिथे कुठलेतरी कुटुंब जेवण करत होते आणि त्यांची मुले खेळत होती. आजूबाजूला काही बाक होते तिथे कोणी झोपले होते तर कोणी चर्चा करत बसले होते. झाडे हि खूप छान होती. कसली होती हे आठवत नाही पण छान होती. 

मग आम्ही पुढे गेलो तर आम्हाला काही पायऱ्या दिसल्या. त्या पायऱ्यांनी आम्ही वर चढायला लागलो. तिथे मोठी मोठी झाडे होती. पायर्यांवर काही झाडांची सुकलेली पाने होती. मोकळी हवा चालू होती. त्यातल्या त्यात, पक्षी चिवचिवाट करत होते आणि शांतता होती. आम्ही तिथे काही फोटो काढले आणि मग पुढे निघालो. पायऱ्यांच्या बाजूला काही काही अंतरावर माहिती असणारे हिरव्या रंगाचे फलक लावले आहेत. त्यात पांडवलेणी बद्दल माहिती आहे. पाहिलंय फलकापासून ते शेवटच्या फलकापर्यंत  खूप छान माहिती दिलेली आहे. पर्यटक गुफेची वैशिष्ट्ये दिली आहेत. त्यासोबतच काही इतिहासाची प्रमाणे दिलेली आहेत. ती सर्व आम्ही वाचली. चालता चालता थोडस दमलो आणि एके ठिकाणी पायऱ्यांच्या वळणाला थांबलो. 

तिथून नाशिक पूर्ण दिसते. म्हणजे जास्तीतजास्त नाशिक, त्यातील डोंगर, इमारती, रस्ते सर्व दिसतात. रस्त्यावरून जाणारी वाहने खेळण्यातल्या वाहनांसारखी दिसतात. तिथे उभे राहून आम्ही मनसोक्त गप्पा केल्या. दिसणारी इमारत कोणती असेल, किवा हे बघ हे ठिकाण मी ओळखतो असे आम्ही इशारा करून दाखवत होतो तिथून.

 

मग आम्ही पुढे गेलो. तिथे वरती तिकीट काढण्यासाठी गेलो. इथून पुढे खरी पांडवलेणी सुरु होणार होती. तिकीट काढण्यासाठी मी काही पैसे आणलेच नव्हते, कारण ट्रेनिंग ला जाताना मी काही ठरवले नव्हते. माझ्या फोनपे मध्ये पैसे होते. त्याने काढूयात असे ठरवले. पण इथे फोनपे वगैरे नाही चालत असे सांगितल्यावर थोडी निराशा झाली. मग आम्ही सर्वांनी दप्तरात बघितले कि कुठे पैसे आहेत का. मग मित्राकडे होते त्याने सर्वांचे तिकीट काढले. कमालीची गोष्ट म्हणजे आमचे तिकीट आणि परदेशी लोकांचे तिकीट, यांच्या किमतीमध्ये खूप फरक होता. तिथे काही खाण्यापिण्याचे पदार्थ विकणारे कोणी नव्हते. कारण सर्वाना माहिती आहे कि हि ऐतिहासिक वास्तू आहे म्हणून. मग आम्ही वरती गेलो. 

पांडवलेणी: 



पहिले पाउल ठेवताच मनात एक आश्चर्य आणि कुतूहल भरून आले. आणि आनंदही झाला. एवढ्या पायऱ्या चढल्यानंतर फायनली इथे पोहोचलो म्हणून एकदम निवांत वाटत होते. आता मस्तपैकी बागडायचे, एक एक गोष्ट निरीक्षण करून पहायची हेच मनात होते. माझ्यातला इतिहास आणि वास्तू प्रेमी जागा झाला. आम्ही समोर दिसणाऱ्या पहिल्या गुफेत गेलो. चप्पल बाहेर काढल्या आणि आत प्रवेश केला. 

पर्वताच्या दगडांना कोरून आणि त्यात गुफा बनवलेली आहे. बाहेर जमिनीच्या सपाट भागापासून थोडा उंचावर एक व्हरांडा आहे. त्याच्या वरती एक छत आहे. छत आणि व्हरांडा यांना जोडणारे खांब आहेत. ते पूर्णपणे दगडांनी  बनलेले आहेत, त्यावर छान असे नक्षीकाम आहे. जास्त नाही पण गरजेपुरती आकृती त्या खांबाना देण्यात आली आहे. बऱ्याच नाही प्रत्येक खांबावर हत्ती च्या मुखाची, आणि इतरही प्राण्यांची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. व्हरांड्यात पाय ठेवताच तुम्हाला एक शांतता आणि गारवा अनुभवतो जो विशेष आहे. अतिशय मिनिमल म्हणतात ना तसे तिथले शिल्प आहे. आत प्रवेश करण्यासाठी एक दरवाजा आहे. एक नाही तर प्रत्येक गुफेसाठी एक आहे. आणि काही गुफांमध्ये थोडासा फरक जाणवतो. आणि तिथे दरवाजे हे नवीन बसवले आहेत हे जाणवते. प्रशासनाने थोडी सुधारणा करण्यासाठी केले असावे. असो ... 

आत शिरल्यावर फरशी नसून तिथे डोंगराचा च भाग आहे जो सपाट केला गेला आहे. तिथे खाली जमिनीवरही कुठेतरी सारीपाट वगैर च्या नक्षी कोरल्या गेल्या आहेत. त्या आताच्या आहेत कि पूर्वीपासूनच आहेत हे काही ठाऊक नाही. भिंतींवर बसलेले बौद्ध भिक्षु आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिकृती आहेत. प्रत्येक गुफेत सारख्याच प्रतिकृती आहेत.  कुठे मोठ्आया आकाराच्णिया तर कुठेतरी छोट्या आकाराच्या. काही स्त्रियांची हो चित्रे आहेत. कुठेतरी वेगळी शिल्पे पण आहेत. आणि प्रत्येक गुफेत काही खोल्या आहेत, तिथे आत शिरताना मोबाईल चा प्रकाश घेऊन जावे लागते. तिथे कुठलीही शिल्पे वगैरे नाहीत. तिथे फक्त आणि फक्त भिंतीला लागून एक उंच ओटा आहे, ज्यावर एक व्यक्ती झोपू शकतो व बसू शकतो. बहुतेक हि जागा बौद्ध भिक्षु ना ध्यान करण्यासाठी असेल. अशा कित्येक खोल्या प्रत्येक गुफेत आहेत.




गुफेत शिरल्यानंतर आतून बाहेर पहिले कि वर असलेल्या रुंद खिडक्या, आणि समोर असलेले दरवाजे यातून पुष्कळ प्रकाश आत येतो. तिथे गेल्यावर त्या काळी लोक कसे राहत असतील याची थोडी फार जाणीव होते. आम्ही तिथे थोडा वेळ फिरलो आणि प्रत्येक गुफा पहिली. त्यानंतर बाहेर आलो. तिथे काही ठिकाणी पाण्याचे कुंड होते. डोंगरातून झिरपणारे पावसाचे पाणी तिथे येऊन साठते. त्याचेही अतिशय कुशलतेने रचना केली आहे हेच जाणवते. खाली पाहून झालेल्या गुफा झाल्यावर वरती सुद्धा गुफा होत्या. 




वनभोजन : 
त्या पाहण्याआधी जेवण करूयात असे वाटले आणि मग आम्ही जेवणासाठी जागा शोधू लागलो. जेवणासाठी काही व्यवस्था किवा जागा तर नव्हती. आणि या ठिकाणी जेवणे योग्य असेल का हेच प्रश्न होते, मग आम्ही डोंगराच्या कडेकडे चालत गेलो आणि तिथे काही लोक जेवत होते. 
खूप सावली, आजूबाजूला दिसणारे नाशिक, शांतता, पक्ष्यांच्या आवाजात आम्ही तिथे जमिनीवर बसून जेवण केले. वनभोजन असावे तसेच. जुन्या काळातही लोक इथेच असेच जेवण करत असतील असे वाटले. 

सहल संपताना: 

मग जेवण झाल्यावर आम्ही पुन्हा नव्या उत्साहाने पांडवलेणी पहिली. तिथे काही अजून नवीन गुफा दिसल्या. त्यात धार्मिक बुद्ध यंत्र असावे, असे मोठे दगडाचे शिल्प दिसले. आणि मग सगळ्या गुफा पाहून झाल्यावर आम्ही तिथे एके ठिकाणी बसून गप्पा केल्या, फोटो काढलेत, काही गोष्टी वाचल्या आणि येणारे जाणारे परदेशी लोक पहिले. भरपूर काही पाहून झाले. मनाला अगदी तृप्त आणि शांत वाटत होते. असे वाटत होते आता इथेच एक विश्रांती घेऊन झोपून घ्यावे. आयुष्यातले आतापर्यंतचे सर्व टेन्शन विसरून मी निवांत झालो होतो. 

मग आम्ही पुन्हा खाली आलो. बाजूच्या बागेत बसलो तिथे थोडी विरंगुळा आणि आराम केला. आणि मग पुन्हा ट्रेनिंग च्या ठिकाणी जाऊन, आपापल्या वाहनांवर घरी गेलो. आणि आज कितीतरी दिवसानंतर मी तो अनुभव इथे लिहितो आहे. आणि लिहिताना मला तिथला प्रत्येक क्षण आठवतो आहे आणि मी मनाने पुन्हा प्रसन्न, शुद्ध आणि शांत होत आहे. तर हि होती अचानक घडलेली आमची सहल, पांडवलेणी ला. नाशिक ला आलात तर पांडवलेणी ला एकदा नक्की भेट देऊन पहा. तुम्हाला शिल्पे, ऐतिहासिक गोष्टी पाहयची इच्छा असेल तर उत्तम. आणि नसेल तरीही तुम्ही एक सहल किवा पिकनिक म्हणून नक्कीच येऊ शकतात. धन्यवाद. 

Wednesday, March 2, 2022

सृष्टी, मनुष्य, धर्म याबद्दल मनात असलेले प्रश्न

सुंदरता, रंग , जीवन , वैविध्य या सर्व गोष्टींनी भरलेली सृष्टी किती छान वाटते नाही का? पृथ्वी छान वाटण्यापेक्षा तिचे असित्व हेच मोठे गूढ आहे. त्यातल्या त्यात प्रत्येक गोष्टीचे, जीवाचे उगमस्थान हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. त्यात मनुष्य असणे हि अहोभाग्याची गोष्ट. मनुष्यालाच आपला उगम कसा झाला, आपले पूर्वज कोण होते या गोष्टीचा शोध लावण्याची उत्सुकता आहे. हि सृष्टी पाचही इंद्रियांनी अनुभवता येते, या पेक्षा मोठी गोष्ट मनुष्यासाठी तरी नाही, आणि त्यातही हा अनुभव व्यक्तही करता येतो, अनुभव हि करता येतो. कितीतरी गोष्टी आहेत ज्या मनुष्याकडेच दुर्मिळ आहेत. असो..

मनुष्याची उत्त्प्ती कशी झाली हा एक प्रश्नच आहे? त्यानुसार नेमका देव कोणता असाही एक प्रश्न आहे? त्याहुनी अवघड म्हणजे देव आहे कि नाही? हे जाणणे. धर्म, जाती, वर्ण इत्यादी गोष्टी कोणी कश्या बनवल्या हे जरी माहिती नसले तरी आपल्याला एवढा अंदाज लावता येतो कि माणसांनी हळू हळू काळासोबत हे सर्व तयार केल असाव, स्वतःच श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी. प्रत्येक देशात, खंडात वेगवेगळ्या प्रकारची लोक सापडतात, तेही वेगवेगळ्या धर्माची. यातला मूळ धर्म कोणता? ग्रीक पुराणांमध्ये असलेले देवी देवता आणि ख्रिश्चन धर्मामध्ये असलेले देवी देवता एकच आहेत का? कि हिंदू देवी देवता मूळ देवी देवता आहेत? मुस्लीम धर्मात मूर्तीपूजा नसली तरी त्यांचाही एक देव आहेच. खरच देवतांमध्ये हि जाती आणि धर्म असतील का? असले तर या जगातील जाती धर्म त्यांनीच निर्माण केले का? जर पूर्ण विश्वाची देवता एकच असेल तर कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला ती देवता आपल्या दरबारात आश्रय देत असेल का? 

जर मनुष्यांनी धर्म निर्माण केले असतील, तर सृष्टीच्या आदिकाळात एकमेकांपासून लाखो मैल दूर असलेले हे लोक, त्यांना सर्वाना हे कसे वाटले असेल कि आपल्यापेक्षा मोठी अशी कुठलीतरी देवता आहे ते? आपला धर्म कोणता? सगळीकडे हि धार्मिक भावना निर्माण कशी झाली असावी याचा शोध बहुतेक कोणीतरी केला असेल आणि लिहूनही ठेवले असेल. असो ......

धर्म जरी बाजूला ठेवला तरी मनुष्याची उत्पत्ती त्याचा विकास कसा झाला, या गोष्टींना शोधणे खूप मजेशीर आणि कुतूहलाने भरलेले आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने एवढे ज्ञान लिहून ठेवले आहे कि कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवावा हेच अवघड होते नाही का? माझ्यासाठी तरी हा सृष्टीच्या जन्मापासून तर मनुष्याच्या विकासाचा प्रवास खूपच  कुतूहलाने भरलेला आहे. या शोधात पूर्णपणे स्वतःला गुंतवून घेणे मला आवडेल, जगातील वेगवेगळ्या संस्कृती जाणून घ्यायला आवडेल. 

तुम्हालाही आवडेल का हि सारी प्रश्न उत्तरे जाणून घ्यायला? 

@गिरीश सोनवणे 

Sunday, November 21, 2021

शांतता

 मनातील क्लिष्ट प्रश्नांना

शांतता कुठे मिळावी

आठवणींच्या प्रवासाला

स्थगिती कुठे कळावी 


कधी न पाठवलेली पत्रं

खूप काही बोलू पाहतात 

न कळलेली अपूर्ण गोष्ट 

ते बरोबर सांगतात 


या अपूर्ण गोष्टीला 

समाप्ती कधी भेटावी

मनातील क्लिष्ट प्रश्नांना

शांतता कुठे मिळावी


पाहिलेली वाट 

सार्थकी लागेल का 

भेट होईल वा 

वेळ लागेल का 


या वाट पाहण्याच्या कार्यक्रमाला 

सांगता कधी मिळावी 

मनातील क्लिष्ट प्रश्नांना

शांतता कुठे मिळावी


वयाच्या प्रत्येक टप्प्यातील 

काही ओल्या आठवणी 

अजूनही परत बघायला लावतात 

आठवू नको म्हणता

कुठल्यातरी कोपऱ्यातून 

प्रत्येक वेळेला डोकावतात 


डोकावणार्‍या आठवणींच्या खिडकीला 

बंदी कधी घालावी 

मनातील क्लिष्ट प्रश्नांना

शांतता कुठे मिळावी


निसर्गाच्या सानिध्यात  

फेरी एक मारून बघावी

हवेची एक झुळूक 

अनुभवून घ्यावी 


हवेची ती झुळुक 

आतपर्यंत कधी जावी 

मनातील क्लिष्ट प्रश्नांना

शांतता कुठे मिळावी


-गिरीश सोनवणे 

All content subject to copyright 

फुले आणि देव

बर्‍याच काळानंतर
ऋतूंच्या खेळानंतर
बहरलेली ती फुले
आज देवाला पावली

निसर्गाने मेहनतीने केलेल्या
संगोपनाची कथा
एका क्षणात सार्थकी झाली
बहरलेली ती फुले
आज देवाला पावली

ऊन, वारा, पाणी
सगळ्यांचे परिपूर्ण मिश्रण
त्या कळीला वाढवण्यात
दिवसरात्र झटलेले असते
कळीपासून आलेली ती फुले
क्षणात झाडापासून वेगळी झाली
बहरलेली ती फुले
आज देवाला पावली

सुईच्या टोकातून
एकसंध धाग्यातून
प्रवास करून
देवाला पुजण्यासाठी
त्यांची माळ सज्ज झाली
बहरलेली ती फुले
आज देवाला पावली

प्रसन्न भक्तांनी ती माळ
देवाला समर्पित केली
देवालाही ती छान भासली
बहरलेली ती फुले
आज देवाला पावली

सगळं काही समर्पित करून
फुले स्वतः मात्र कोमेजून गेली
कोमेजलेल्या फुलांना देव नाही म्हणाला
भक्तांनी सारी फुले कडेला टाकून दिली
स्वतः संपूनही आनंदी राहिली
कोमेजलेली ती फुले
आज देवाला पावली

- गिरीश सोनवणे


All content subject to copyright

आठवणी

ज्या मनापासून आनंद देतात त्या आठवणी पुन्हा जगावयाशा  वाटतात. जसे की बालपण. शाळा, परिपाठ, पकडापकडी, लपाछपी , मित्र मैत्रिणी, गृहपाठ, शिक्षक हे सर्व आठवतात. सगळ परत कराव वाटत. कॉलेज life पुन्हा जगा विशी वाटते. एखाद्या आवडत्या व्यक्ति ला पुन्हा बघाव वाटत. त्याच वेळ ला झालेल्या चुका कुणालाच कधीच दिसू नयेत अस वाटत. ग्लानी, निराशा सर्व काही विसरावे वाटते. हृदयाला लागलेल्या गोष्टी विसरून जाव्यात अस वाटत. पण ते अशक्य. जे धूसर असत ते विसरायचा प्रयत्न करायला गेल की त्या आठवणीला आपण पुन्हा गिरवतो आणि ती गडद होते 🤞🤞 

व्यक्त होणे

 व्यक्त करणं सोप आहे.. जस्ट आपल्याला  जे म्हणायचंय ते बोलायच आहे किंवा दाखवायचे आहे.. पण त्यासाठी लागणारा आत्मविश्वास, एनर्जी, तयारी यासाठी खूप वेळ लागतो. कधी कधी व्यक्त न होने हेच चांगले असते, उगाच व्यक्त होत राहन हे आपलीच किम्मत कमी करते. कोणालाही इतरांचे प्रॉब्लेम मध्ये इंट्रेस्ट नसतो. आणि आनंदात पण नाही. असला तर काही क्षणापुरता असतो...मनातले सगळे बोलून टाकत जा ह्या motivational lines फक्त instagram पुरताच मर्यादित ठेवा.. नुसत मनातल सगळ्याना सांगत बसल तर एक दिवस तुमचीच किम्मत कमी होईल.. व्यक्त होणे सोपे असले तरी अव्यक्त राहणे एक कला आहे... जो व्यक्ति नेहमी व्यक्त होत नाही त्याच्या व्यक्त होण्याला किंमत असत. तर कधी कुठे कस व्यक्त व्हायचे हे समजल पाहिजे.. नाही का?

एखादी गोष्ट खटकत असेल तर ......

खटकत असलेली गोष्ट दुर्लक्षित करावी नाहीतर सोडून द्यावी.. नात सोडावे की नाही हे तुमच्यासाठी ते नाते किती महत्त्वाचे आहे त्यावर depend...कधी कधी जर तुम्हाला confidence असेल की तुमच भविष्य चांगल होईल तर नात्यापासून दूर राहू शकता काही काळ.. आणि एखादी गोष्ट का खटकते ते एकदा चेक करून पहा. कदाचित विनाकारण च आपण त्या गोष्टीचा तिरस्कार असू आणि ती एखादी छोटीशी गोष्ट असेल. दुसर्‍याच्या नजरेने परिस्थितीकडे पाहील तर चूक कळेल कोणाची आहे ती 😊हे फक्त माझ मत, उत्तर नाही 🤞🤞 

Attitude

 Attitude म्हणजे दृष्टिकोन. तो  positive किंवा  negative असतो.. पण आपण हा शब्द गर्व वगैरे चा समानार्थी  म्हणून वापरतो. सो  attitude आपल्यापुरता असावा. खूप असला तरी फक्त आपल्यापुरता. जर एखादी व्यक्ति तुमच्याशी नीट बोलत असेल तर आपणही नम्रपणे बोलाव. आपल्याला काही जास्त येत, आणि आपण सुंदर आहोत, श्रीमंत आहोत या गोष्टींचा attitude ठेवायचा नाही. माझ्यासमोर तरी सर्वानी त्यांचा attitude खिश्यात ठेवावा असा आपला attitude असावा . Attitude या गोष्टीचा ठेवावा की आपण पूर्ण मेहनत  केलीय, आपण positive आहोत, आणि आपण कोणापेक्षा कमी नाही. हा attitude अन confidence असावा.  

आयुष्यावर प्रेम का कराव?..

आयुष्य हे तुमच्याकडे limted आहे. त्यातल्या त्यात वेळ हातात असलेल्या वाळू सारखी सरकत जाते. उद्याचा ही काही भरवसा नाही. शरीराची ही वापराची expiry डेट असते. बुद्धी, डोळे, मन, स्पर्श, चव, सगळे आहे आयुष्यात मिळालेल. आनंद, दुःख हेही अनुभवता येत. सगळ्या प्राण्यांप्रमाणे ch आपण आहोत तरी आपल्यात खूप काही जास्त आहे. या सगळ्या गोष्टी अमूल्य आहेत. पण वेळ कमी आहे. 100 वर्षे अशीच निघून जातात.

आणि पुन्हा मागे येता येत नाही. आणि या आयुष्यानंतर काही आहे की नाही याचीही काही खात्री नाही. तर या आयुष्याची एवढी जास्त किम्मत असेल तर त्याला आपण जपायला हव, आणि जगायला हव. म्हणून प्रेम कराव आयुष्यावर.   

ऑनलाईन शिक्षण- शिक्षक, विद्यार्थी, syllabus आणि परीक्षा

हल्ली सर्व काही पुन्हा पूर्ववत होत चाललंय. पुन्हा लोकांची कामे सुरु झालीत, कुठे हॉटेल्स वगैर पण चालू झालेत. रिक्षा, taxi, बस वगैर पण सुरु झालेत. आता कुठेतरी सर्व काही चालू होताना दिसतंय. त्यासोबत पुन्हासारखी घाई आणि वर्दळ हि दिसतेय. मास्क लावणे हे आधी वेगळेच वाटायचे पण सध्या ते सर्वांच्या दैनंदिन चालीरीतीत बसले आहे. नाही म्हणता म्हणता सर्व जणांनी कोविड चा हा धर्म स्वीकारलाच म्हणयला लागेल.

यात परत सुरु झाले नाहीत ते शाळा आणि कॉलेज. ऑनलाईन lecture आहेत. खरा वर्ग आणि ऑनलाईन वर्ग यात काहीसा फरक तर आहेच. पण त्या माध्यमातून तरी शिक्षण सुरु आहे म्हणजे देव पावला. सुरुवातीला खूप साऱ्या अडचणी यायच्या. शिक्षक हि ऑनलाईन पद्धत शिकत होते, विद्यार्थी हि थोडेसे घाबरत होते, शिकत होते. नेटवर्क चाही भरपूर प्रोब्लेम होता खूप ठिकाणी. पण आता सर्व काही जवळपास ठीकठाक झाले आहे. आता सर्व नॉर्मल आहे असे वाटते.

ऑनलाईन म्हटल कि शिक्षक आता कुठून तरी PPt डाउनलोड करून घेतात आणि आपल शिकवायला सुरुवात करतात. काही शिक्षक स्वतः ppt बनवतात आणि शिकवतात. काही समजावून सांगतात. काही फक्त एकदा ppt घेतली कि फक्त वाचतात. जे लिहिलंय तेच एका लाईन मध्ये परत बोलतात आणि झाल. आणि syllabus पटापट कसा संपेल याच्या मागे असतात. या सगळ्या गोष्टी पण बदलयला हव्यात.

एक semester सहा महीन्याच असत, आता ते एका दोन महिन्यात उरकवून त्यात परीक्षा पण घेऊन होतात. या पद्धतीत खरच विद्यार्थ्याला गुणवत्ता मिळते का? practical ची परीक्षा घेतात, पण practical नाही , मग हे practical चे गुण काय उपयोगाचे? नाही का . व्यावसायिक अभ्यासक्रमात तरी practicals व्हायला हवेत, त्याशिवाय ते शिक्षण व्यावसायिक कसल ?

विद्यापीठाला तरी कळायला हव कि एक दोन महिन्यात एवढा अभ्यासक्रम खरच विद्यार्थ्यांना समजतो का? त्यांना गुणवत्ता मिळतेय का? जर असेच चालत राहिले तर , व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणता म्हणता हा फक्त पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम आहे अस म्हणाव लागेल.

या सगळ्यात चार महत्त्वाचे भाग म्हणजे शिक्षक, विद्यार्थी , कॉलेज आणि विद्यापीठ. या सर्वात समन्वय असला कि सर्व काही व्यवस्थित होईल. विद्यार्थ्याने हि आपली जवाबदारी समजायला हवी. हे सर्व overall मित्र, विद्यार्थी आणि एकंदरीत सर्व परिस्थिती याच्यावरून मांडल. आता बऱ्यापैकी सर्व नीट दिसतंय. शिक्षणाच्या बाबतीत सध्या तरी सर्व काही सुरळीत चाललंय, पण विद्यापीठाशी असलेली तक्रार कधी निस्तरेल अस सध्या वाटत नाही.

पुन्हा त्या वेळेत परत जावसं वाटतंय

आठवणींचा काही वेळ नसतो. कधीही कशावरूनही आपल्याला त्या गाठू शकतात. अगदी एकट असल तरी आणि गर्दीत असल तरी. रोजप्रमाणे आज laptop उघडला आणि स्क्रीनसमोर जाऊन बसलो. काही नवीन आलय का हे बघायचं असत. मग इमेल , twitter website वगैर आलंच त्यात. सगळ चेक्क करत असताना वाटल कि आज काहीतरी लिहावं. लिहायला बसलो मग. समोरच लिहिण्यासाठी कोर पान open झाल.मग त्यात काय लिहावं सुचेनास झाल. काही लिहावं पण मग आवडल नाही कि backspace दाबून सर्व पुसून टाकाव असच चालल खूप वेळ.मग वाटल लिहू नये आणि मग सगळ पुसून आल ते परत कोर पान. आज एकतर वातावरण खूप छान आहे. थंड हवा आणि मंद नवा प्रकाश. सर्व काही छान. पण लिहायला काहीच नाही.मग फक्त त्या white स्क्रीन कडे पाहत बसलो.

मग मला असच वातावरण पाहून आधीचे दिवस आठवले. आधीचे म्हणजे शाळेच्या वेळेचे जेव्हा मी तिसरी चौथीला असेल. आमची शाळा ... म.न.पा. शाळा क्रमांक ९९ . शनिवारी सकाळी शाळा असायची. वातावरण सेम आज सारखेच बर का . थंड हवा सूर्य नुकताच उगवणार असायचा. आम्ही कंपनी च्या एका रूम मधेच राहायचो . पण पूर्ण परिसरात कोणीच नसायचं कारण सगळ्या कंपन्या बंद असायच्या. सकाळी लवकर उठून, शाळेचा गणवेश घालून तयार असायचो. खूप भारी वाटायचं शनिवारची शाळा म्हणजे. आम्ही दोन तीन मित्र पायीं पायी शाळेत जायला निघायचो. थंडी असो काही असो कुडकुडत का होईना शाळा मात्र आवडायची. मग हळू हळू तो रस्ता चालत जायचो. कोणीतरी शेकोटी करत असल कि थोड्या वेळ बसायचो आणि परत शाळेला. थोडी मस्ती करत कधी शर्यत लावत तो लांबचा रस्ता पूर्ण करायचो. हे सगळ आज आठवल कि खूप छान वाटत.

शाळेत जाऊन परिपाठाला उभ राहायचं , लेट झाला कि छड्या खायच्या. परिपाठ तर असायचा त्यासोबत कवायत पण असायची शनिवारी. अशे अवघड अवघड व्यायाम करायला लावायचे कि काही विचारूच नये. अवघड नसायचे पण खूप वेळ त्या band आणि खुळ्खुल्याच्या आवाजावर तेच तेच परत करत राहायचे. नाही केल तर सर मागेच उभे असायचे. कधी band कधी पिआनो वापरून शिक्षक जणू आमच्यावर प्रयोगच करायचे. प्रार्थना सुविचार वगैरे आटोपलं कि मग कुठेतरी वर्गात न्यायचे. मग कसातरी वर्ग भरायचा. शिकवण काही व्हायचं नाही शनिवारी.

हजेरी वगैर द्यायची आणि कधी एकदा जेवणाची सुट्टी होते ती वाट बघायचो. मग दरवाज्याच्या चौकटीतून खिचडी वाल्या मावशी दिसल्या किवा त्यांची रिक्षाचा आवाज आला कि लगेच कळायचे कि आता सुट्टी होणार. मग एकदा घंटा वाजली कि आपापला डबा घेऊन सर्व जन तो संपवायचो लवकर आणि मग खेळायचो. कधी जोडीची साखळी कधी चोर पोलीस कधी पकडापकडी. खूप मजा असायची जणू हेच life होत. काहीच टेन्शन नाही. मग सुट्टी झाली कि घरी जायचं आणि दिवसभर नुस्त खेळायचं आणि खेळायचं.

किती छान होत सगळ. आता ते सर्व आठवल कि अस वाटत परत वेळेत मागे जावं आणि परत तसच सगळ कराव.

आता मग हे सगळ स्क्रीन वर उतरवल आणि मग मनाला कुठे बर वाटल. माझ्या मताने तुम्हाला पण आठवत असेल तुमची शाळा आणि अश्याच काहीतरी आठवणी असतील ना ! वाटल तर comment मध्ये share करा .

ते पुढे गेलेत मग तू मागे का ?

प्रत्येकाच आयुष्य , इंग्रजीत म्हणायला गेल तर life हे वेगवेगळ असत. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त असतो मग तो सुखी असो वा दुखी. बरोबर ना. पाहिजे असते फक्त शांती .मनाची शांती. आपल्याला स्वतःच मोठ अस घर असाव , त्यात सार्‍या सुविधा असाव्यात, त्यासाठी खूप पैसा असावा आणि चार लोकानी आपल्याला ओळखाव ,आपल ऐकाव अस  आयुष्य म्हणजे सुखी आयुष्य होय अशी सर्वांची मान्यता आहे . 

अगदी माझी पण बऱ्यापैकी तशीच धारणा आहे. अन यात वाईट काय ? काहीच नाही. अगदी आई,वडील भाऊ,बहिण सर्व जर खुश असतील तर आपल्याला आणखी काय हव ,नाही का . आता हे सर्व सगळ्यांनाच मिळेल अस तर नाही . कदाचित मिळूही शकेल. प्रयत्न तर आपण सगळेच करतोय . पण सगळ्यांना हे एकाच वेळी मिळेल हे शक्य आहे का . सांगा तुम्हीच. शक्य असेल तर मला आश्चर्य होईल . 

जर तुमच उत्तर नाही असेल तर तुम्ही माझ्यासारखे विचार करणारे असाल बहुतेक. आपण आपल कर्म करत राहायचं फळाची अपेक्षा न करता . पण फळ हे मिळणार हे माहिती . अस कुठेतरी ऐकलय. किवा वाचलंय. आपल्या आयुष्यात आपली जी स्थिती आहे त्यासाठी आपणच प्रयत्न करायचे असतात हव तर इतरांची मदत घ्यायची असते . पण आपण हातपाय मारल्याशिवाय आपल्याला पोहोता येत नाही तसच आयुष्याच. आपल्याला कोण काय म्हणतय लोक काय म्हणताय याने फरक नसला पडत तरी घरातील मंडळी आणि समाज याची जाणीव नक्की करून देत असतात. 

उदाहरण द्यायचं झाल तर अमुक व्यक्ती खूप पुढे गेलीय आणि आपण मात्र जिथे आहेत तिथेच आहोत अस सांगण. नक्कीच त्या व्यक्तीने परिश्रम घेतले असतील अन ती व्यक्ती पुढे गेली असेल , पण मग आपण काहीच नाही केल असा त्याचा अर्थ होतो का .  प्रत्येकाची शक्ती , विचार करण्याची पद्धत , त्याची परिस्थिती ,त्याला मिळालेली लोकं सर्व वेगवेगळ असत . तुम्हाला यशस्वी व्यायच असेल तर तुमच्यात ईर्ष्या असणेही गरजेचे आहे. पण लोकांनी अस म्हणणे कि तुम्ही का यशस्वी होत नाही आहात , समोरच्या अमुक व्यक्तीने बघा किती कमी वयातच आपल आयुष्य सुधारल , हे ऐकून एकदम स्वतःला कमी समजणे हि माझ्यामते चुकी आहे. 

जगातील सर्वात श्रीमंत लोक काय एकाच वयात श्रीमंत झालेत का ? सर्व यशस्वी माणसे अगदी लहान वयातच यशस्वी होते का ? कदाचित नाही . हो न . आपल्याला त्याच्यासारखं आयुष्य मिळवायचं आहे म्हणून यश मिळवण्यासाठी घाई करायची , याचा काही उपयोग नाही. यात सगळ काही लवकर मिळवण्याच्या चक्कर मध्ये तुम्ही मात्र स्वतःला जो वेळ दिला पाहिजे , ज्या गोष्टी शिकल्या पाहिजे त्या वरचेवर शिकतात आणि मग जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगात पडतात तेव्हा तुमच्या अपूर्ण कलेला आणि ज्ञानाला काही किंमत नसते आणि यशापासून तुमची दुरी वाढतच जाते .

दुसर्यांच्या यशाच्या गतीला पाहून त्यांच्यासारख पटकन यश मिळवण्याच्या मागे लागण्यापेक्षा स्वताच्या गतीने पूर्ण ज्ञान आत्मसात करून मग वाटचाल  केलेली बरी. लोक तर तुम्हाला म्हणतील कि बघ ते तुझ्या पुढे निघून गेलेत आणि तू मागे , पण हे ऐकून स्वतःला कमजोर किवा निराश करून घेण्यापेक्षा किवा घाई करण्यापेक्षा आपण आपल्या क्षमता लक्षात ठेवाव्या आणि हे लक्षात ठेवाव कि प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असते . आज त्याची वेळ आहे उद्या माझी असेल . 

आजच्या ब्लॉग मध्ये कोणताही फोटो नाही टाकला याच कारण म्हणजे बघायचं आहे कि कोणा कोणाला अगदी विना फोटोंच वाचनाची आवड आहे . तुमच्या प्रतिक्रिया comments मध्ये नक्की द्या तुम्हाला काय वाटत . 


पुन्हा त्या वेळेत परत जावसं वाटतंय

आठवणींचा काही वेळ नसतो. कधीही कशावरूनही आपल्याला त्या गाठू शकतात. अगदी एकट असल तरी आणि गर्दीत असल तरी. रोजप्रमाणे आज laptop उघडला आणि स्क्री...